भिंगारमध्ये गावठी कट्टा विकणारा अटकेत

0

अहमदनगर : गावठी कट्टा विक्री करणार्‍या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दीपक रामचंद्र गायकवाड (रा. गंगापूर, औरंगाबाद) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

नगर-पाथर्डी रस्त्यावर बुर्‍हाणनगर चौकात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबर्‍याकडून गावठी पिस्तुल विक्रीसाठी तरूण नगरात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी कर्मचार्‍यांना सापळा लावण्याचे आदेश दिले.

बुर्‍हाणनगर चौकात संशस्यापद हालचाली दिसल्यानंतर पोलिसांनी गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला. 24 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त करून भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यास अटक केली.

LEAVE A REPLY

*