Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भंडारदरा पर्यटकांसाठी पुढील दोन दिवस एकेरी वाहतूक

Share

नाशिक । प्रतिनिधी
15 ऑगस्टसह एकत्र आलेल्या सुट्या आणि पर्यटकांची वाढती गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने भंडारदराकडे जाणार्‍या मार्गानां एकेरी वाहतूक करण्याचे ठरविले आहे.

14 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिन व ऑगस्ट 16 रोजी पतेतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने, पर्यटकांचा मोठा लोंढा भंडारदरा येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने दिनांक ऑगस्ट 14 ते दिनांक ऑगस्ट 16 पर्यंत एकेरी मार्गाने वाहतूक वळविण्याचे ठरविले आहे. तसे आदेशच अहमदनगर पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांनी दिले आहे.

एकाच वेळेस आलेल्या सुट्यांमुळे या कालावधीत भंडारदरा येथे भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा (घाटघर), हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, सनवाडी व वाल्मिक ऋषी आश्रम, कोदणी (ता.अकोले) अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्या पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. विशेष करून पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई,अहमदनगर, संगमनेर, अकोले, इगतपुरी, घोटी व इतर टिकाणाहून पर्यटक यांची फार मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. यावर्षी पावसाने या भागात कहरच केला आहे. धरण भागाला तर पावसाने खूप झोडपले आहे.

अशा परिस्थतीत रस्त्यांची ही दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी रस्त्याला तडे देखील गेले आहेत. याठिकाणाचे रस्ते देखील अरुंद असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सांभाळणे कठीण होणार आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक सिंधू यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की सदर भागातील रस्ते हे अरुंद असून सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे.

रस्ते खराब झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यादृष्टिकोनातून सदर भागात वाहतूक नियमन करून एकेरी वाहतूक करण्याचा नर्णय पोलिसांनी घेतला आहे.

सध्या राज्यात सर्वत्रच पावसाने झोडपले आहे. ठिकठिकाणी रस्त्याला तडे जाणे, रस्ता खचणे, रस्त्यांना असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होणे, या घटना सर्वत्र समोर येत आहे. पर्यटकांनीही भान ठेवून एखाद्या जागेला भेट द्यावी व पोलिसांना मदत करावी अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!