रेल्वे स्टेशन येथील पॉवर हाऊस बुरूडगाव रोडवर स्थलांतरित करावे; भगवान फुलसौंदर यांची मागणी

0

अहमदनगर : शहरातील माळीवाडा पॉवर हाऊस हे अनेक वर्षापासून इंम्पीरिअर चौकात येथे होते.

गेल्या 2 महिन्यापासून सदर कार्यालय स्टेशन रोड येथे स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निरकारण होण्यास मोठ्या अडचणी येत आहे. त्यामुळे सदर कार्यालय बुरूडगांव परिसरात स्थलांतरीत करावे अशी मागणी शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन मागणी केली आहे.

माळीवाडा परिसर, मार्केट यार्ड, बुरूडगांव रोड परिसरातील नागरिकांना तक्रार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे, त्यामुळे सदर कार्यालय बुरूडगांव रोडवरील मनपाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात स्थालांतरित करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने फुलसौंदर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*