नगर बाजार समितीमध्ये मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी सुरू

0

अहमदनगर : राज्य सरकारने नाफेडमार्फत हंगाम 2017-18 मध्ये यापुर्वी मुग व उडीद खरेदी आधारभुत दराने सुरू करावयाचे ठरविलेले होते. त्यामध्ये आता सोसाबीनही खरेदी करावयाचे ठरविले आहे.

नाफेडमार्फत करावयाच्या खरेदीकरीता शेतकर्‍यांचे मुग व उडीदाची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे काम नगर बाजार सामितीमध्ये दिनांक 03 ऑक्टोबर 2017 पासून सुरूवात केलेली आहे.

नव्याने सोसाबीनचीही नोंदणी दिनांक 10 ऑक्टोबर पासून बाजार समितीचे कार्यालयात सुरूवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे नगर बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांची ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरूवात करणत आलेली आहे.

तरी शेतकर्‍यांनी आपले मुग, उडीद व सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी करणेकरीता सातबारा उतारा, राष्ट्रीयकृत बँकेच्या खाते पासबुकची झेरॉक्स प्रत व आधार कार्ड झेरॉक्स सोबत घेवून यावेत असे आवाहन नगर बाजार सामितीतर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*