ठेवींवर मारला टाऊक

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – ठेवीदारांनी मोठ्या विश्‍वासाने पतसंस्थेत ठेवी ठेवल्या. त्याच्या पावत्याही दिल्या गेल्या, मात्र त्यची नोंद रोजकीर्दीत घेतलीच नाही. अशा सव्वा कोटी रुपयांच्या मुदतठेवीचा गफला संचालक मंडळाने केल्याची बाब लेखापरीक्षणात समोर आली आहे. केडगाव येथील अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत हा घोटाळा झाला आहे. 

सहकार विभागाचे विशेष लेखा परीक्षक शिरीष कुलकर्णी यांनी ‘अंबिका’चे लेखा परिक्षण केले. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2018 या काळातील लेखा परीक्षणात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. ठेवीदारांनी विश्‍वासाने पतसंस्थेत ठेवी ठेवल्या. त्याची पावती देताना रोजकिर्दीत नोंद करणे आवश्यक होते. मात्र तशी नोंद न घेता 1 कोटी 24 लाख 75 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. ठेवींबाबत मुदत ठेव काऊंटरवर तपशील नमूद केला, मात्र त्याचीही रोजकिर्दीत नोंद घेतली नाही. मुदत ठेव काऊंटरवरील 58 लाख रुपयांची अफरातफर संचालक मंडळांनी केली. बचत, दैनंदिन ठेव, रिकरिंग खात्यात कमी रक्कम शिल्लक असतानाही जादा रक्कम अदा करून 12 लाख 21 हजार रुपयांचा घोटाळा करण्यात आला.

आर्थिक कामकाजाच्या दैनंदिन नोंदी घेणे गरजेचे आहे. पतसंस्थेतील व्यवस्थापन व कर्मचार्‍यांवर अध्यक्ष, उपाध्यक्षांचे नियंत्रण असते. मात्र असे कोणतेच नियंत्रण नसल्याने हा घोटाळा झाला. पतसंस्थेचे चेअरमन सर्जेराव नारायण निमसे, उपाध्यक्ष ज्ञानदेव वामनराव शिंदे यांच्यासह संचालक मंडळ जबाबदार असल्याचा निष्कर्ष लेखा परीक्षणात काढण्यात आला आहे.

पित्याच्या दुर्लक्षामुळे मुलाची राजकीय अडचण
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेसचे केडगावातील विद्यमान नगरसेवक सुनील कोतकर यांचाही समावेश आहे. संस्थेचे चेअरमन सर्जेराव कोतकर यांचे ते चिरंजीव आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दाखल झालेला हा गुन्हा सुनील कोतकर यांना अडचणीत आणणार ठरणार आहे. पतंसस्थेतील घोटाळ्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्दही कलंकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

*