नगर औरंगाबाद रोडवर बोलोरो जीप व ट्रक अपघातात सात जण जागीच ठार

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील बाबा सैलानी येथे दर्शनासाठी जाताना नगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी शिवार फाटा येथे बुधवारी पाहटे २ वाजता ट्रक व जीपच्या समोरासमोरील भीषण धडकेत बोलोरो जीपमधील सात जण भाविक जागीच ठार झाले.

मयत सर्व राहणार यवत (जिल्हा पुणे) येथील रहिवासी आहेत.

औरंगाबादवरून पुण्याकडे चाललेली मालट्रक (एमएच २० एटी ४६५०) ने समोरून येणाऱ्या भाविकांच्या बोलोरो जीपला (एमएच १२ एफएफ ३३९२) जोरदार धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे : 

मनोहर रामभाऊ गायकवाड (वय ४५ ), अंकुश दिनकर नेमाणे (४५), मुबारक अब्नास तांबोळी (५६), बाळू किसान चव्हाण (५०), स्वप्नील बाळू चव्हाण (१७), गोकुळ रामभाऊ गायकवाड (४०), अरुण पांडुरंग शिंदे (५०)

 

LEAVE A REPLY

*