Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

एटीएममधून पैसे चोरणारा जेरबंद

Share
अहमदनगर (प्रतिनिधी) – जेष्ठ नागरिक व महिलांचे हातचालखीने एटीएममधील पैसे काढणार्‍या उच्चशिक्षित तरूणास सायबर पोलिसांनी रविवारी (दि. 9) जेरबंद केले. धिरज शिवकुमार कालीया (वय 42, रा. आरटीओ ऑफिस जवळ) असे आरोपीचे नाव आहे. 20 जून रोजी आगरकरमळा येथील नारायणदास बन्सीलाल गांधी यांचे हातचालखीने एटीएममधून 20 हजार रूपये घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी सायबर पोलिसच ठाण्याचे बाळकृष्ण कदम यांनी माळीवाडा परिसरात असणार्‍या एटीएमचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेत त्यांची कसून तपासणी सुरू केली होती. या घटनेतील आरोपी हा मार्केट यार्ड चौकात येणार असल्याची माहिती कदम यांना मिळाली होती.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!