अहमदनगर : अशोकभाऊ फिरोदिया स्मृती करंडक : वाडिया पार्कात क्रिकेटचा महाकुंभ

एक लाखाचे बक्षीस

0

अहमदनगर : वाडिया पार्कच्या मैदानावर 20 जानेवारीपासून राज्यातील क्रिकेटपटुंचा महाकुभं भरणार आहे. शालेयस्तरावर होणारी अशोकभाऊ फिरोदिया स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेसोबतच यंदा राज्यस्तरीय खुली क्रिकेट स्पर्धा होणार आहे. 20 जानेवारीपासन शालेयस्तरीय तर 30 जानेवारीपासून राज्यस्तरीय स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती छायाताई फिरोदिया यांनी दिली.

अशोकभाऊ फिरोदिया यांची 1975 मध्ये अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्य प्रमुख कार्यवाहपदी निवड झाली. त्यावेळी त्यांनी शालेयस्तरावर क्रिकेट वाढविण्यासाठी शाळा व जिल्हास्तरावर प्रयत्न सुरू केले. अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर अशोकभाऊंनी जिल्ह्याच्या क्रिकेटस्तर महाराष्ट्रत उंचवावा या हेतूने अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याची प्रेरणा घेत पुढे शालेय व जिल्हास्तरावर फिरोदिया कंरडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने त्यासाठी सहकार्य केले. या स्पर्धोमुळे अनेक शालेय खेळाडू राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. काही खेळाडू महाराष्ट्राच्या रणजी करंडक स्पर्धेत खेळले आहे. शालेयस्तराव होणार्‍या क्रिकेट स्पर्धे सोबतच यंदा राज्यस्तरावर स्पर्धा होणार आहे. 20 ते 29 जानेवारी दरम्यान शालेय तर 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्याची माहिती कल्पतरू उद्योग समूहाचे प्रमुख गौरव व कल्याणी फिरोदिया यांनी दिली.

शालेय गटात विजेत्या संघाला करंडक व 31 हजार रुपये रोख तर उपविजेता संघाला करंडक व रोख 21 हजार बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीतील दोन्ही संघाना करंडक व 11 हजार, प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ दी मॅचचा करंडक तसेच मॅन ऑफ दि सिरीजसाठी 5 हजार व करंडक, उत्कृष्ट फलदांज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक यांना प्रत्येकी 3 हजार व करंडक अशा स्वरूपाचे पारितोषिक देणार आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 1 लाख रुपयांचा रोख बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. उपविजेता संघाला करंडक व रोख 51 हजार, उपांत्य फेरीतील दोन्ही संघाना करंडक व 15 हजार रूपये देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ दी मॅचचा करंडक तसेच मॅन ऑफ दि सिरीजसाठी 11 हजार रूपये व करंडक, उत्कृष्ट फलदांज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक यांनाही प्रत्येकी 5 हजार रूपये व करंडक देण्यात आहे. यावर्षी बक्षिसामध्ये वाढ केली असल्याचे आमदार व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरूणकाका जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*