Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

Breaking : अण्णा हजारेंशी चर्चा सुरूच ; 3 तासानंतरही तोडगा नाहीच

Share
अहमदनगर : लोकपाल व विविध मागण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले आहे. दरम्यान उपोषणामुळे अण्णांच्या प्रकृती खालावली आहे. अण्णा उपोषणावर ठाम असल्याने अण्णांची मनधरणी करण्यासाठी मंगळवारी (दि.०५) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगण मध्ये दाखल झाले. तब्ब्ल तीन तासाहून अधिक काळ चर्चा झाली असताना देखील अद्याप कोणतंही तोडगा निघाला नाही.

मुख्यमंत्री राळेगण मध्ये आले असता आज उपोषण सुटणार अशी चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग दिल्लीकडे रवाना झाले आहे. चर्चा अद्याप देखील सुरु असून अण्णांचे उपोषण सुटणार कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!