अशक्तपणामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

0
अहमदनगर : गेल्या आठवड्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालसाठीचे सरकारविरोधातील उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतर अण्णांना अशक्तपणा जाणवत आहे. बुधवारपासून जास्त अशक्तपणा जाणवू लागला. अशा परिस्थितीत चेकअप करणे खूप गरजेचे असल्याने डॉ. सय्यद आणि डॉ. धनंजय पोटे यांच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी नगरला आणण्यात आल्याची माहिती अण्णा हजारे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

अण्णांनी गेल्या महिन्यात ३० जानेवारीपासून उपोषण आंदोलन केले होते. यादरम्यान त्यांचे जवळपास साडेचार किलो वजन घटले होते. उपोषणानंतर आज त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नगरमधील नोबेल या खासगी रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या तब्येतीच्या विविध तपासण्या करण्यात येत आहेत. त्यांच्यावर किमान २ दिवस रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या नोबल हॉस्पिटलला डॉ. बंदिष्टी आणि डॉ. कांडेकर यांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अण्णांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चिंतेचे काहीही कारण नाही, असेही कार्यालयातून सांगण्यात आले आहे. त्यांच्यासोबत समन्वयक संजय पठाडे, माजी स्वीय सहायक सुरेश पठाडे आहेत.

LEAVE A REPLY

*