रस्त्यावर उतरल्याशिवाय शिक्षकांचे प्रश्‍न सुटणार नाही : राठोड

0

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – समाजाचा व देशाचा पाया शिक्षक आहे. शिक्षक युवकांना दिशा देण्याचे कार्य करतात. शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत आहे. शिक्षण क्षेत्राशी शिक्षण मंत्र्यांच संबंध नसल्याने वेगवेगळे अफलातून जीआर शिक्षकांच्या माथी मारले जात आहे. न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय शिक्षकांचे प्रश्‍न सुटणार नसल्याचे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले.
महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने माऊली संकुल सभागृहात शिक्षक दिन समारंभा निमित्त मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राठोड बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर सुरेखा कदम, आयुक्त घनशाम मंगळे, सभागृहनेते गणेश कवडे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका भुतकर, उपसभापती सुनिता मुदगल, प्र. प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, नसीम शेख, शिक्षक सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे आदि व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रांती सानप-पालवे व विठ्ठल तिवारी यांनी केले. यावेळी शहरातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राठोड म्हणाले की, वरती शासन खाली समाज यामध्ये शिक्षक अडकला आहे. शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिवसेना नेहमीच पुढे राहिली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांस हात लावल्यास पालक धावून येतात. तर गुदगुल्या करीत शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करण्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला. पुढील वर्षापासून शिक्षक पुरस्कारात आर्थिक तरतुद करण्याची त्यांनी विनंती केली.  

LEAVE A REPLY

*