मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील – अजित पवार

0
माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सताधार्यांवर टिकास्त्र

अकोले (प्रतिनिधी)- केंद्रात व राज्यात जातीयवादी विचार सरणींच्या विरोधात असणारे हे भाजपचे सरकार 2019 पर्यंत महाराष्ट्र राज्यावर 5 लाख कोटी रुपये कर्जाचा डोंगर उभा करून जाणार आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षनाच्या धोरणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी हवे ते प्रयत्न केले जातील अशी ग्वाही राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेया विधानाचा देखील त्यांनी समाचार घेतला. पवार म्हणाले कि, राम कदम हा रावण नसून रावणाच्या पुढची त्याची आवृत्ती आहे .भाजपचे मंत्री चूकीचे काम करतात या मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली असून नोटा बंदीमुळे चांगले काम झाले नाही तर वाटूले झाले. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल अशी स्थिती असतांना येथे मात्र धक्कादायक निकाल लागल्याने येथे मात्र राष्ट्रवादी ची सत्ता येऊ शकली नाही अशी सल त्यांनी व्यक्त केली. अकोले तालुक्यातील पळसुंदे येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाचे जलपूजन व लोकार्पण सोहळा आज आ.अजित पवार व आ.शशिकांत शिंदे यांचे शुभहस्ते पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड होते.

LEAVE A REPLY

*