अकोले तालुक्यातील गर्दनी येथे एकाची निर्घृण हत्या

0

अकोले तालुक्यातील गर्दनी येथील दशरथ नाईकवाडी यांच्या कडे आलेले त्यांचे मेहुणे धोंडीबा नारायण वाकचौरे             (वय-६८,रा.परखतपूर,ता.अकोले) यांची दोघा जणांनी निर्घृण हत्या केल्याची घटना काल गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली.

हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र मयत वाकचौरे हे वारकरी संप्रदयातील व निराधार असल्याने ते अगस्ती आश्रम येथे रहात होते.

काल ते आपल्या बहिणीकडे गर्दनी येथे गेले होते. रात्री घरासमोरील पडवीत झोपले असतांना पदवीचा दरवाजा उघडा राहिला.

हत्या करणाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला होता. वाकचौरे यांच्या ओरडल्याने नाईकवाडी यांनी घराच्या खिडकीतून पाहिले असता दोघे जण मोटारसायकल वरून फरार झाले.

वाकचौरे हे अध्यात्मिक क्षेत्रातील असल्याने त्यांचे कुणाशी वैर नसल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे चोरीच्या किंवा घरातील कुणा व्यक्तीचाच काटा काढायचा या उद्देशातुन हा खून झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यामुळे गर्दनी परिसरात खळबळ उडाली आहे

LEAVE A REPLY

*