Breaking : नाशिकमधील बस अपघातात अकोलेतील तरुण ठार  

0
अकोले ( प्रतिनिधी) : जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा-चांदवड राज्य महामार्गावरील भावडबारी घाटात बस व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ५ जण जागीच ठार झाले आहेत. या मृतांमध्ये अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील दिपक कुलकर्णी हा युवक ठार झाला आहे.त्याच्या अपघाती निधनाचे वृत्त अकोले तालुक्यात समजताच शोक व्यक्त केला जात आहे.चितळवेढे येथील अनेक ग्रामस्थ नाशिक कडे रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

*