Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

वकील संघटनेचे शेखर दरंदले अध्यक्ष

Share
गजेंद्र पिसाळ उपाध्यक्ष, सचिवपदी प्रसाद गांगर्डे, गीतांजली पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहर वकिल संघटनेच्या गुरुवार दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड.शेखर दरंदले यांनी बाजी मारली असून त्यांना 515 मते मिळाली आहेत. तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.गजेंद्र पिसाळ (556 मते) निवडूण आले आहेत. तसेच सचिवपदी अ‍ॅड.प्रसाद गंगार्डे, महिला सचिवपदी अ‍ॅड.गितांजली पाटील (369 मते) निवडूण आले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा मतमोजणी संपल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांनी गुलालचा उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

यावेळी वकिल संघटनेची निवडूण आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे – सहसचिव अ‍ॅड.सुनिल आठरे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.सुधाकर पवार, अ‍ॅड.सुभाष वाघ, अ‍ॅड.प्रणवकुमार आपटे, अ‍ॅड.महेश शिंदे, अ‍ॅड.बबन सरोदे, अ‍ॅड.कश्यप तरकसे, अ‍ॅड. अनुजा मोहिते आदी. या निवडणूकसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड.अरुण भालसिंग, अ‍ॅड.भाऊसाहेब घुले, अ‍ॅड.संदिप शेळके, अ‍ॅड.कैलास कोतकर आदींनी कामकाज पाहिले. यावेळी जेष्ठ अ‍ॅड.सुरेश लगड, अ‍ॅड.शारदा लगड आदींसह मोठ्या संख्येने वकिल वर्ग उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!