गुरुजीची लिफ्ट अंगलट; भिंगारमध्ये पतीचा पत्नीवर अ‍ॅसीड हल्ला

0

भिंगार (प्रतिनिधी)- शाळेत गेलेल्या मुलांना घेण्यासाठी जात असलेल्या महिलेला शिक्षकाने दिलेली ‘लिफ्ट’ चांगलीच महागात पडली. ‘लिफ्ट’ देणार्‍या शिक्षकाची बाईक अडवून संतप्त पतीने पत्नीच्या अंगावर घातक अ‍ॅसीड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. भिंगार येथे गुरूवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान पोलिसांनी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

श्रीकांत आनंद मोरे असे आरोपी पतीचे नाव आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव पौर्णिमा श्रीकांत मोरे (वय 23) असे आहे. अ‍ॅसीड अंगावर पडल्याने भाजलेल्या पौर्णिमा मोरे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पौर्णिमा या मुळच्या अलमगीर येथील प्रबुध्दनगर येथे राहणार्‍या आहेत. 8 वर्षापूर्वी केकती येथील यशवंतनगरमधील श्रीकांत मोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले सावतानगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. गुरूवारी नेहमीप्रमाणे मुले शाळेत गेली होती. पौर्णिमा या मुलांना शाळेतून घेण्यासाठी पौर्णिमा केकती येथून निघाल्या. ओळखीचे शिक्षक मोटारसायकलवरून जाताना त्यांना दिसले. त्यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. शिक्षकांनी त्यांना लिफ्ट दिली. दरम्यान भिंगारकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या डेअरीफार्मजवळ श्रीकांत यांनी त्यांची मोटारसायकल अडविली. त्यानंतर शिक्षकाला तेथून जाण्याचे सांगितले. दोघांत वादविवाद झाले. त्यानंतर श्रीकांत यांनी पौर्णिमा यांच्या अंगावर घातक अ‍ॅसीड टाकून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या पौर्णिमा यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पौर्णिम मोरे यांच्या फिर्यादीवरून भिंगार पोलिसांनी पती श्रीकांत आनंद मोरे (रा. केकती) यांच्याविरुध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ओळखीच्या शिक्षकाच्या मोटारसायकलवरून जात असताना पतीने रस्त्यात अडवून कौटुंबिक वादाचा राग मनात धरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अ‍ॅसीड अंगावर टाकल्याने फिर्यादीत म्हटले आहे.

श्रीकांत मोरे हे सेंटरींगचे काम करतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. पौर्णिमा यांचे पतीसोबत वाद असून त्या गत आठ महिन्यापासून वेगळ्या राहतात. त्याच वादातून हा हल्ला झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमाने यांनी दिली.

LEAVE A REPLY

*