Tuesday, April 23, 2024
Homeनगर4 लाख 40 हजार बालकांना उद्या पोलिओचा डोस

4 लाख 40 हजार बालकांना उद्या पोलिओचा डोस

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यात रविवार (दि.31) ला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणाकरीता

- Advertisement -

जिल्हयामध्ये शुन्य ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामिण भागात 3 लाख 77 हजार 358 शहरी भागात 16 हजार 669 व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 46 हजार 260 असे जिल्हयामध्ये एकूण 4 लाख 40 हजार 287 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.

या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 3 हजार 521 बुथ, शहरी भागात 87 व महानगरपालिका क्षेत्रात 374 असे एकूण जिल्हयामध्ये 3 हजार 982 बुथवर एकूण 9 हजार 110 कर्मचार्‍यांमार्फत पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. राज्यस्तरावरुन जिल्हयाकरीता 6 लाख 10 हजार पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली आहे.

नागरिकांनी या मोहिमेमध्ये शुन्य ते 5 वर्षे वयाच्या बालकांना यापुर्वी पोलिओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पुन्हा पोलिओ डोस घेऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 100 टक्के यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष तथा सभापती, आरोग्य व शिक्षण समिती प्रताप शेळके, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या