डॉ. सहस्त्रबुध्दे यांना संत सेवा गौरव पुरस्कार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – श्रीगोंदा येथील संत शेख महंमदमहाराज देवस्थान उत्सव प्रतिष्ठानचे विश्वस्त तथागत श्रीरंग अंबादास लोखंडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा संत शेख महंमदमहाराज संत सेवा गौरव पुरस्कार प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांना जाहीर झाला आहे.

संत सदगुरू शेख महंमदमहाराज यांच्या यात्रा उत्सव 1991 पासून प्रतिष्ठान व ग्रामस्थ मोठया भक्तिभावाने दरवषी फाल्गुन शुध्द एकादशी पासून सप्ताह स्वरूपात साजरा करतात. 2015 मध्ये उत्सवाचा रौप्य महोत्सव मोठया दिमाखदार साजरा झाला. या निमित्ताने श्रीरंग अंबादास लोखंडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने संत शेखमहंमदमहाराजांचे समग्रवाड.मय साथ स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी तनमनधनाने जीवाचे रान करून अथक परीश्रम केले.

रौप्यमहोत्सवी स्मरणिका संपादन करून सामाजिक ऐक्याचा संदेश सर्वापर्यत पोहचविला आपले सेवा कार्य यशस्वी करून लोखंडे महापरिनिर्वाणास गेले. प्रतिष्ठानने त्यांच्या स्मृतीप्रित्यथ संत सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा संकल्प केला.संत शेखमहंमदमहाराज यांचा योगसंग्राम हा सर्वात महत्वाचा ग्रंथ प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांनी साथ स्वरूपात लिहून संपादित केला.

प्रतिष्ठानने प्राचार्य डॉ.सहस्त्रबुध्दे यांना संत सेवा गौरव पुरस्कार या वषीच्या यात्रा उत्सवात रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या हस्ते काल्याच्या किर्तनप्रसंगी प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारी (14 मार्च) सकाळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*