नायलॉन मांजा बॅन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिवसेना मंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनीही नगर शहरात नायलॉन मांजा बॅन करण्याचे आदेश दिले आहेत. तशा नोटीसा विक्रेत्यांना धाडा असे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

जानेवारी महिन्यात नगरात पतंगोत्सव साजरा केला जातो. आकाशात शेकडो पतंग दिसून येतात. पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा वापरला जातो. काटाकटीची स्पर्धा सुरू असते. मात्र त्या नायलॉन मांजात अडकून पशुपक्षी तसेच मोटारसायकलस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी शिवसेनेच्या महापौर कदम यांनी हे पाऊल उचलले आहे. आतापासूनच शहरात नायलॉन मांजा येणार नाही याची खबरदारी कदम यांनी घेतली आहे. त्यामुळे आताच विक्रेत्यांना नोटीसा बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. नगर शहरात नायलॉन मांजा येणारच नाही यासाठी कदम यांनी नाकाबंदी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

*