नगरच्या 29 बिल्डरांचा मोदींशी थेट संवाद

0

क्रेडाईचा पुढाकार

दिल्लीत दोन दिवसीय परिषद

अहमदनगर (प्रतिनिधी) – भविष्यातील घर बांधणी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील तीन हजार बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधणार आहे. यात नगरचे 29 बिल्डरांचा समावेश असून हे बिल्डर आज (मंगळवारी) दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

के्रडाई युथकॉन निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यादांच रियल इस्टेट विकासकांसोबत संवाद साधणार आहेत. दिल्लीतील ताल्कटोरा स्टेडियममध्ये बुधवार, गुरूवार (दि. 13 ते 14) दोन दिवस क्रेडाईने परिषद आयोजित केली आहे. क्रेडाईचे देशभरातील तीन हजार सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत. क्रेडाईचे देशभरात 12 हजार सदस्य आहेत. वोमेन्स विंग, न्यू इंडिया समीट असे उपक्रम क्रेडाईने राबविले आहेत. आता युथकॉन हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष जयेश शहा यांनी दिली.

नगर शहरातील संजय गुगळे, संजीव गुगळे, अशिष पोखरणा, प्रकाश मेहता, अ‍ॅड. भापकर, हेमचंद्र इंगळे यांच्यासह 29 बिल्डरांना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधण्याची मिळणार आहे. या बिल्डरांसोबत मोदी हे ‘वन टू वन’ संवाद साधतील अशी माहिती नगर क्रेडाईचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी दिली. नगरचे 29 बिल्डर आज सायंकाळी दिल्लीकडे प्रस्थान करणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता परिषदेस प्रारंभ होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोदी हे बिल्डरांशी संवाद साधतील असे गुगळे यांनी सांगितले.

देशातील पहिलीच परिषद
परवडणार्‍या दरातील घरे आणि सरकारची मेक इन इंडिया मोहीम, रेरा या क्षेत्रातील महत्त्वाच्या तसेच वित्तीय मुद्द्यांवर प्रगतशील सत्रे घेऊन क्रेडाई युथकॉन 2019 सज्ज झाली आहे. देशभरातील ही पहिलीच भव्य अशी परिषद असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी लाभादायक वातावरण निर्मिती करण्यात परिषद यशस्वी होईल असा दावा क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जयेश शहा यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*