Friday, May 3, 2024
Homeनगरअहमदनगर : 13194 उमेदवार निवडणूक रिंगणात

अहमदनगर : 13194 उमेदवार निवडणूक रिंगणात

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यातील 721 ग्रामपंचायतींमधील 7 हजार 234 सदस्य पदाच्या जागांसाठी 13 हजार 194 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोमवारी

- Advertisement -

उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 9 हजार 10 उमेदवारांनी माघार घेतली आहेत. यामुळे 13 हजार 134 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आता पुढील 9 दिवस निवडणूक प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 23 हजार 803 अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जाची 31 डिसेंबरला छाननी होऊन त्यात 619 अर्ज अवैध ठरले होते. तर 23 हजार 148 वैध ठरले होते. सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी 9 हजार 10 उमेदवारंानी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून निवडणूक रिंगणात 13 हजार 194 उमेदवार आहेत. यामुळे आता पुढील 9 दिवस निवडणूक असणार्‍या गावात प्रचाराची

धुराडी रंगणार आहे. आरोप-प्रत्यारोप, सभा, नेत्यांच्या प्रचार फेर्‍यामुळे गावागावांतील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

तालुकानिहाय बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये अकोले 0, संगमनेर 4, कोपरगाव 0, श्रीरामपूर 1, राहाता 6, राहुरी 0, नेवासा 7, नगर 3, पारनेर 9, पाथर्डी 3, शेवगाव 0, कर्जत 2, जामखेड 10, श्रीगोंदा 1 अशा एकूण 46 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

……………..

असे आहे चित्र

767 ग्रामपंचायती

2 हजार 650 प्रभाग संख्या

2 हजार 859 मतदान केंद्र संख्या

7 हजार 234 सदस्य संख्या

15 लाख 50 हजार 491 मतदार संख्या

8 लाख 13 हजार 31 पुरुष मतदार

7 लाख 37 हजार 451 महिला मतदार

9 अन्य मतदार

………………

निवडणूक लढणारे आणि कंसात माघारी घेतलेले

अकोले 566 (385), कोपरगाव 598 (511), श्रीरामपूर 577 (511), राहाता 570 (569), राहुरी 863 (501), पारनेर 1350 (812), शेवगाव 843 (440), कर्जत 1003 (665), जामखेड 734 (427) तर संगमनेर 1482 (932), नेवासा 1020 (932), नगर 1172 (655), पाथर्डी 1320 (872) आणि श्रीगोंदा 1096 (953) असे निवडणूक रिंगणातील उमेदवारी 13 हजार 194 आणि माघार घेतलेले 9 हजार 10 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या