Wednesday, April 24, 2024
Homeनगरझेंडीगेट परिसरात ११०० किलो गोमांस जप्त

झेंडीगेट परिसरात ११०० किलो गोमांस जप्त

अहमदनगर|Ahmedagar

गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. 3 लाख रूपये किंमतीच्या टेम्पोसह 2 लाख 20 हजार रूपये किंमतीचे 1 हजार 100 किलो गोमांस जप्त केले आहे. सकाळी साडेआठ वाजता झेंडीगेट येथील बाबा बंगाली परिसरात कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आलतमश नासीर पठाण (रा. मुकुंदनगर, नगर), फैजल कुरेशी, मोहसीन कुरेशी (दोघे रा. झेंडीगेट, नगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सुशील वाघेला यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आलतमश पठाण याला अटक केली आहे.

झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून टेम्पोमधून मांस विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती. सकाळी निरीक्षक मानगावकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार, उपनिरीक्षक कचरे यांच्यासह कर्मचार्‍यांना सोबत घेऊन नमूद ठिकाणी साडेआठच्या सुमारास छापा टाकला. यावेळी एक टेम्पो (क्र. एमएच- 3 एएच- 6055) मिळून आला. त्याची झडती घेतली असता यामध्ये 2 लाख 20 हजार रूपये किंमतीचे 1 हजार 100 किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी टेम्पो, गोमांस जप्त करून तिघांविरूद्ध भादवि 269 सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या