अहमदनगर : सिनेट निवडणूक : विखेंचे बंधू विजयी

0

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीत पाच पैकी तीन जागा प्रगती पॅनेलने पटकावल्या आहेत.

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधूही निवडणूक रिंगणात आहेत.

विद्यापीठ एकता पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

व्यवस्थापन प्रतिनिधी पदांच्या जागेवर विद्यापीठ प्रगती पॅनलचे संदीप कदम, राजेेंद्र विखे पाटील विजयी झाले. सुनेत्रा पवार या अगोदरच बिनविरोध आल्या होत्या. एकताचे सोमनाथ पाटील व श्यामकांत देशमुख विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस रिंगणात आहेत. ते पदवीधरमधून निवडणूक लढवित आहेत. पदवीधरच्या 10 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. हा निकाल रात्री उशिरापर्यंत लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*