उत्तराखंडमध्ये अहमदनगरचे भाविक अडकले

0
बद्रीनाथ/अहमदनगर – उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे हजारो भाविक अडकले आहेत. या भूस्खलनात महाराष्ट्रातले एकूण 179 भाविक, तर अहमदनगर शहर, कोपरगाव, शनिशिंगणापूर (नेवासा), श्रीगोंदा मधील अनेक भाविक शुक्रवारपासून काशीमठ परिसरात अडकून पडले आहेत.
राज्यासह देशभरातील 13, 500 भाविक उतराखंडमधील वेगवेगळ्या भागात अडकले आहेत. सर्व भाविक सुखरूप असून ते राज्य सरकारच्या संपर्कात आहेत अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ यात्रेला गेलेले नगर जिल्ह्यातील सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यातील जवळपास सर्वांशी संपर्क झाला असल्याचे सांगण्यात आले असले तरी नगर शहरातील  सुलभा राजेश सटाणकर व अनिता संतोष सटाकरण यांचा अद्याप संपर्क झालेला नाही.
अहमदनगर जिल्ह्यातून यात्रेला गेलेल्या भाविकांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला. अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असणार्‍या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला. जिल्हाभरातून फोन येत असल्याने जिल्हा प्रशासन सर्तक झाले. त्यांनी जिल्ह्यातील विविध ट्रॅव्हल कंपन्यांशी संपर्क साधता यात्रेकरूशी संपर्क होतोय की नाही याची खात्री केली. तसेच उत्तरंचल प्रशासनाशी संपर्क साधला. कोपरगावमधील ट्रॅव्हलने 30, नगरमधील ट्रव्हलने 110 भाविक या यात्रेला गेले आहेत. यासह नगरमधून खासगी वाहनाने 8 तर रेल्वेने 2 महिला, शिंगणापूर येथील ट्रॅव्हलने गेलेले 40, श्रीगोंदा तालुक्यातील वेगळवेगळ्या भागातून 80 भाविक बद्रीनाथ-केदारनाथ यात्रेला गेले आहेत. यातील बहुतांशी भाविकांशी संपर्क झाला असून ते शनिवारी सकाळपर्यंत सैन्याच्या बेस कॅम्पमध्ये होते. रविवारी दुर्घटनाग्रस्त भागातील दळणवळण सुरू होणार असून त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तराखंड व बद्रिनाथ येथील रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. मात्र, काही रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे. उत्तराखंड येथील जोशीमठ येथे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सात भाविक अडकले आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे.
सर्व पर्यटक सुरक्षीत : मुख्यमंत्री
उत्तराखंड राज्यातील विष्णू प्रयाग येथे झालेल्या भूस्खलनामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या राज्यातील 179 यात्रेकरु अडकले आहेत. तेथे कोणतीही जिवीत व वित्तहानी झालेली नाही. राज्य शासन स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून सर्व यात्रेकरु सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली. या यात्रेकरुंमध्ये 179 यात्रेकरु असून औरंगाबाद, पुणे, सांगली, जळगाव, अहमदनगर, बीड, नाशिक आदी ठिकाणच्या या यात्रेकरुंचा समावेश असून सर्व यात्रेकरु सुखरुप आहेत. उत्तराखंडच्या चार्मोली जिल्हाधिकारी यांच्याशी या संबंधी बोलणे झाले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

………….
सुलभा साटाणकर आणि अनिता साटाणकर या गेल्या आठवड्यात रेल्वेने नगरहून उत्तराखंडमधील बद्रीनाथ-केदारनाथ यात्रेला निघाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या हरिव्दार येथे असतांना त्यांचा नगरमधील नातेवाईकांशी संपर्क झाला होता. हरिव्दारयेथून त्या बद्रीनाथ-केदारनाथ यात्रेला निघणार होत्या. तेव्हापासून त्यांचा संपर्क तुटलेला आहे. शनिवारी रात्रीपर्यंत त्यांचा संपर्क झाला नसल्याची माहिती राजेश सटाणकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

*