गळफास पाहून बालसुधारगृह भेदरले

0

मुलांना समुपदेशनाची गरज  

अहमदनगर (प्रतिनिधी) –  नगरच्या बालसुधारगृहात एका विधीसंघर्ष बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना पाहिल्यामुळे तेथील अनेक बालके भेदरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तसेच या घटनेनंतर चाईल्ड लाईन संस्थेने मुलांची मानसिकता जाणून घेतली असता बालकांच्या मनात भितीचे वातावरण असल्याचे लक्षात आले. त्यामुळे बालसुधारगृहात मनोरंजनाचे उपक्रम राबवून त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
मंगळवारी (दि.10) पहाटे खुनाच्या गुन्ह्यातील एका बालकाने बालसुधारगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उठलेल्या बालकांनी पाहिला. कधी नव्हे असे चित्र पाहिल्यानंतर बालके भेदरलेल्या अवस्थेत काळजी वाहकाकडे गेले.
त्यांना घाबरलेल्या अवस्थेत पाहिलेला प्रकार सांगितला. काळजीवाहकाने घाबरून मुलांना आत पाठविले. त्यांची देखील पळताभुई थोडी झाली. त्यांनी पोलीस व वरिष्ठांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू झाली. खरे पाहता मयत मुलगा अनेक दिवसांपासून भितीयुक्त वातावरणात जगत होता.
मला आत्महत्या कारायची आहे. असे तो मित्रांना सांगत होता. त्याने मित्राच्या सहाय्याने चिठ्ठी देखील लिहिली होती. आत्महत्या करण्याच्या आधी तणावाखाली जगणार्‍या मुलांना बालसुधारगृह स्थिर करू शकत नाही. बालके पळून जातात, त्यांच्यावर आळा घालू शकत नाही.
तसेच जिवघेण्या हल्ल्याची मजल मुलांची होते. अशा मुलांचे समुपदेशन करू शकत नाही. तर अधिकारी व कर्मचार्‍यांची तेथे गरज काय आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शुल्लक कारणांमुळे बालसुधारगृहातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यांचे डोके ठिकाणावर आहे का? –
बालसुधारगृह हे असुरक्षवरून नेहमी चर्चेत राहिले आहे. कधी बालके पळून जाणे, सुरक्षा रक्षकावर हल्ला होणे, सनी शिंदे सारख्या बालकाची हत्या होणे, अधिक्षकांच्या चुकीने अपहरण झालेल्या मुलांना पुन्हा अपहरण करणार्‍यांच्या ताब्यात देणे. तर कर्मचारी झोपा काढत असताना बालकांनी गळफास घेणे. अशा अनेक प्रकारांना जबाबदार असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची डोकी ठिकाणावर आहेत का? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणार –
बालसुधारगृहातील अन्य मुलांची मानसिकता अशा प्रकारची होऊ नये यासाठी त्यांच्याशी मनसोक्त बोलणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी उपक्रम राबविणे, समुपदेशन करणे, अशा घटनांपासून अलीप्त राहणे, नव्या जगाची ओळख करून देणे, जिवनात स्वत:ची ओळख, जिद्द, कष्ट, यश, अपयश अशा गोष्टींची ओळख करून देणे गरजेचे आहे. मी गुन्हा केला आहे. ही गोष्ट बालकांच्या डोक्यातून हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
– प्राची सोनवणे (चाईल्ड लाईन समन्वयक)

 

 

LEAVE A REPLY

*