Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

‘प्रेझेन्ट’ नव्हे तर ‘जय हिंद’ म्हणा

Share

गुजरात : मध्य प्रदेश सरकारनंतर आता गुजरात सरकारनेही शाळांमध्ये जय हिंदच्या घोषणा देण्याचे आदेश काढले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा आदेश काढण्यात आला आहे. शाळांमध्ये मुलांनी हजेरी देताना जय हिंद किंवा जय भारत अशा घोषणा द्यायच्या आहेत. हा नवा आदेश गुजरात सरकारच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

या अधिसूचनेनुसार, इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ अथवा ‘जय भारत’ बोलून हजेरी लावावी लागणार आहे. सरकारी शाळा, अनुदानित तसंच विनाअनुदानित शाळांना या अधिसूचनेचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. १ जानेवारी २०१९ पासून या अधिसूचनेच पालन करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुदासमा यांनी हा निर्णय घेतला आहे.

काय आहे हा नियम?

मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांची हजेरी घेतली जाते. त्यावेळी प्रत्येकाचा रोल नंबर पुकारला जातो. त्यावर मुलं ‘यस सर’ किंवा ‘यस मॅडम’ असं म्हणतात. तर लागू केलेल्या या नव्या नियमानुसार यस सर म्हणण्या ऐवजी ‘जय हिंद’ असं बोलायचं.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!