विश्वजित माने नगर जि.प. चे नवे सीईओ

0

नगर : नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विश्वजित माने यांची झाली आहे. आज राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात नगर जिल्हा परिषद व महापालिकेचा समावेश आहे.

सध्याचे सीईओ रवींद्र बिनवडे यांची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली झाली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. सी. मंगले अहमदनगर महापालिकेचे नवे आयुक्त असतील.

तर मनपा आयुक्त दिलीप गावडे यांची नाशिकला आदिवासी विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

LEAVE A REPLY

*