बंदच्या पार्श्वभूमिवर नगरला साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

0
नगर : आरक्षणााच्या मागणीवर आक्रमक होत मराठा समाजाने पुकारलेला पाहता नगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे साडेतिन हजार पोलिस बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान पोलिस बंदोबस्तात एस.टी. बसेस सोडल्या जात आहेत.

पंढरपूरहून नगरकडे येणाऱ्या एसटी बसेसला पोलिस संरक्षण पुरविण्यात आलेले आहे. नगर शहरात व जिल्ह्यात बुधवारी रास्ता-रोको आंदोलन होणार असल्याने साडेतीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

संगमनेर तालुक्यातील अज्ञात जमावाने एसटी बस जाळली. तर शेवगावमध्ये बसवर दगडफेक झाली आहे. या आंदोलनामुळे नगर जिल्ह्यात पोलिस प्रशासन दक्ष झाले आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गावर कायगाव टोका येथील पुलावर आंदोलन सुरू असल्याने हा महामार्ग ठप्प झालेला आहे. त्यामुळे ही वाहतूक पांढरीपूल येथून मिरी मार्गे, घोडेगाव, नेवासा फाटा या मार्गे वळविण्यात आली. नगर-पुणे महामार्ग, नगर-सोलापूर, नगर-मनमाड, नगर-दौंड या महामार्गांवर सुरुळीत वाहतूक सुरू होती. हे महामार्ग आंदोलकांकडून अडविले जाऊ नये म्हणून पोलिसांकडून दक्षता घेण्यात आली.

या महामार्गावर इतर महत्त्वाचे रस्ते असे बारा रस्तांवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होते. नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम येथील पुलावर नगर पोलिसांचा बंदोबस्त असून, या पुलावर नगरमधील एक पोलिस अधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक व स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

एसटी बसेस बंद झाल्याने पंढरपूर येथे भाविक अडकून पडले होते. दुपारनंतर पोलिस बंदोबस्तात पंढरपूरहून नगरकडे बसेस येत होत्या. नगर, पाथर्डी, जामखेड आगारातून पोलिस बंदोबस्तात रिकाम्या बसेस पंढरपूरला पाठविण्यात आल्या. एकावेळी दहा बसेसला पोलिस एस्कॉर्ट देत आहे.

जिल्ह्यात स्ट्रायकिंग फोर्स नेमण्यात आला असून, प्रत्येकी १५ जणांच्या ३० तुकड्या जिल्ह्यात तैनात करण्यात आलेल्या आहे. बुधवारी जिल्ह्यात रास्ता-रोको आंदोलन होणार आहे. त्यासाठी साडेतीन हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे.

पोलिस बंदोबस्त

अतिरिक्त पोलिस अधीक्षक-२

पोलिस निरीक्षक-२५

पोलिस उपनिरीक्षक-१२०

पोलिस कर्मचारी-३०००

शिघ्र कृती दल-१००

 

आंदोलकांच्या केसेस मोफत लढणार

आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर गुन्हे दाखल होतील, त्या केसेत मोफत लढण्याचा निर्णय नगर शहर वकील संघटनेने घेतला आहे. तसा ठराव वकील संघटनेने मंगळवारी घेतला आहे. वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठोकळ यांनी हा ठराव मांडला. मराठा समाजातील अनेक आमदार, मंत्री सातत्याने सरकारमध्ये सत्तेत असून, समाजास हक्काचे आरक्षण मिळालेले नाही, असे ठोकळ म्हणाले.

अॅड. सुरेश लगड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जलसमाधी आंदोलनात बळी पडलेल्या काकासाहेब शिंदे या युवकास श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. कृष्णा झावरे, सचिव प्रशांत मोरे, महिला सचिव अनुराधा येवले, सहसचिव चंदन बारटक्के, शिवाजी कराळे, नानासाहेब पादीर, महेश काळे, गौरव दांगट, अमोल गावडे, मंगेश सोले, शेखर दरंदले, सलीम रंगरेज आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*