उपायुक्तांना कुत्रा भेट

0

भाजयुमोचे आंदोलन, महापालिकेत दिला ठिय्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरात रोजच कोणीतरी जखमी होत आहे. महापालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करा या मागणीसाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी महापलिकेत ठिय्या आंदोलन केले.

उपायुक्त विलास वालगुडे यांना प्रतिकात्मक कुत्रे भेट देत अनोखी गांधीगिरी करण्यात आली. या आंदोलनामुळे महापालिकेतील कामकाज काही काळ ठप्प झाले. महापालिकेत सेना-भाजपची संयुक्तपणे सत्ता आहे. भाजपचे हे आंदोलन म्हणजे सेनेला घरचाच आहेर समजला जातो.

युवामोर्चाचे अध्यक्ष नितीन शेलार, सरचिटणीस सागर कारळे, तुषार पोटे, अज्जू शेख, सतीश शिंदे, मिलिंद भालसिंग, पियुष जग्गी, शशिकांत पालवे, उमेश साठे, अभीजित चीप्पा, शरीफ सय्यद, नितीन जोशी, कान्हैया व्यास, सुरज पुंड, अक्षय भालेराव, कैलास गर्जे, अविनाश साखला, दीपक उमप, अंकुश भापकर, सतीश सरोदे, निलेश शेळके, जावेद तांबोळी, सुरज कोरडकर या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही गांधीगिरी केली.

शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांवर कोणतीच कारवाई करत नाही. त्याचा जाब आंदोलकांनी उपायुक्तांना विचारला.

तसेच शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे मांस विक्रीचे दुकाने चालू आहेत. मांस विक्रेतेन विकला गेलेले मांस रस्त्यावर टाकतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागले आहेत.

त्यातूनच माणसांवर हल्ले करण्याची त्यांची मानसिकता झाली आहे. शहरात बेकायदा सुरू असलेली मांस विक्रीची दुकाने बंद करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उपायुक्त विलास वालगुडे यांनी तातडीने श्वान निर्बीजीकरण पथकास फोन करून शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी वाहनांची संख्या वाढवण्याचा आदेश दिला. तसेच पकडलेल्या कुत्र्यांचा अहवाल सदर करण्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*