LIVE Updates : आधीचे सरकार घोटाळ्यांचे, गेल्या पाच वर्षात देशाने मजबूत सरकार पाहिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये जाहीर सभा

0

अहमदनगर | प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला मराठी भाषेतून सुरुवात झाली. नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून देशाने मजबूत सरकार बघितले. याआधीचे घोटाळ्यांचे सरकार होते. आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आज जग भारताकडे महासत्ता म्हणून बघते आहे. जगासमोर असलेल्या मजबूत भारताने खुश आहात की नाही?  शरद पवारांना काय झाले आहे? आता दोन पंतप्रधान होण्याची चर्चा होते, आपण किती वेळ गप्प बसणार? आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी ते धोका देण्यासाठी आहे का? असा सवालही मोदींनी केला.

शिवाजी राजांच्या भुमितुन तुम्ही हे काय करत आहात? राष्ट्र सुरक्षा मुद्यावर भारत एक याचा आनंद आहे. कॉंग्रेसचे सरकार असताना सतत देशात बॉम्बस्फोट होत असत. यात अनेक निष्पापांचा बळी जात होता. मात्र, आता आपण चौकीदाराचे सरकार बघितले आहे. देशाला धोका असलेल्या दहशतवाद्यांना पाताळातून शोधून काढू असेही मोदींनी यावेळी ठणकावले.

२०१४ च्या निवडणुकीनंतर मोदींची आजची नगरमधील ही तिसरी सभा होती. सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून चोख नियोजन करण्यात आले होते.

मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नगरला छावणीचे स्वरूप आले असून जवळपास दोन हजार पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • आज विकास वेगाने होत आहे. यामागे जनतेने दिलेल्या मतांची ताकद आहे.
  • शेतकरीवर्गासाठी अनेक योजना आणल्या.
  • यावेळी अनेक संकल्प पुन्हा मोदी सरकार आल्यावर पीएम किसान योजनेत बदल होणार
  • अधिक शेतकरी लाभ घेतील
  • शेत मालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न
  • उस उत्पादक शेतकरीसाठी निर्णय घेतले
  • विशेश जलसंपत्ती मंत्रालय निर्माण करणार
  •  शिवाजी महाराज यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मत द्या

11.44 : मुख्यमंत्री फडणवीस यांची राष्ट्रवादीवर टीकास्र

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला मोठी मदत केली आहे, सोबतच नगरमध्येही मोदींनी मदत पोहोचवली. पश्चिम खोरे पाणी वळवले जाणार आहे. खासदार दिलीप गांधी यांनी चांगले काम केले त्यांना विसरणार नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांच्यावर टीका करत मोदींना राज्यातील जनता विसरणार नाही असेही फडणवीस म्हणाले.

11.40 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत आहेत.

11.36 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नगर मध्ये आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील सोबत

11.34 : लोक विकास करता का म्हणून टीका करतात; त्याना कोणी उत्तर द्यायचे – खासदार गांधी चिडले

11.34 : खासदार गांधी चिडले,  भाषण थांबविण्याचा प्रयत्न

11.10  मोदींचे हेलीकॉप्टर नगरमध्ये दाखल

11.04 : थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर दाखल होणार

11.03 आरपीआयचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण सुरु

LEAVE A REPLY

*