कृषी सेवा केंद्रास आग; २५ लाखांचे नुकसान; चार तासानंतर आग आटोक्यात

0
देवळा ( प्रतिनिधी ) | शहरातील आनंद अग्रो या कृषी सेवा केंद्राला पहाटे आग लागून २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामन दलाच्या जवानांना यश आले.
देवळा बाजार समितीचे संचालक जगदिश पवार यांचे समितीच्या व्यापारी संकुलात बी-बियाणे व रासायनिक खत विक्रीचे दुकान आहे.

काल (दि. १६) रात्री रविवारी आठच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. आज पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागली. या आगीत जवळपास २५ लाखांचे बी-बियाणे तसेच रासायनिक खते जाळून खाक झाले.

आज पहाटे तीनच्या सुमारास कळवण रोडवरील नागरी वसाहातीत चोर असल्याच्या संशयामुळे येथील नागरिक घराबाहेर आले होते.

याचवेळी व्यापारी संकुलातील आनंद अग्रो या दुकानातून धूर निघतांना काही नागरिकांनी बघितले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्याशी भ्रमण ध्वनीवरुन संपर्क साधत दुकानाचे मालक जगदिश पवार यांना फोन करुन बोलावून घेतले.

यावेळी पोलिस निरिक्षक गुलाबराव पाटील व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत सटाणा येथील अग्निशामक केंद्राशी संपर्क साधला व अग्निशमन बंब मागविले.

बंब दाखल होईपर्यंत येथील नागरिकांनी मोटारच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक वाहनाने पाण्याच्या चार फेऱ्या मारत चार तासांच्या अथक परिश्रमाणे आग आटोक्यात आणली.

LEAVE A REPLY

*