वर्षभरानंतरही 1 लाख 77 हजार शेतकरी ‘पीएम किसान’च्या लाभापासून वंचित
कृषिदूत

वर्षभरानंतरही 1 लाख 77 हजार शेतकरी ‘पीएम किसान’च्या लाभापासून वंचित

Balvant Gaikwad

मोबाइल, खाते क्रमांक जुळत नसल्याचे कारण देऊन होतेय टाळाटाळ

आतापर्यत जिल्हा परीसरात पीएम किसान योजनेंतर्गत लाभासाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटूंबाच्या सुमारे 1 लाख 77 हजारच्यावर शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.  यापैकी 1, लाख 30 हजाराच्या वर शेतकरी खातेदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेंचे खातेदार आहेत. त्यांच्या खात्यावर या योजनेतर्गत दोन हप्त्यांचा निधी वर्ग करण्याची प्रकिया करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या  शेतकर्‍यांपैकी 28हजार शेतकरी खातेदारांचे बॅक खाते, आधार क्रमांक वा मोबाईल जुळणी होत नाही वा चुकीचे नंबर आहेत. शेतकर्‍यांचा आधार डाटा, बॅक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक जोडणी अथवा दुरुस्तीसाठी संबधीत बॅक अधिकार्‍यांशी संपर्क साधून आपली माहिती दुरुस्ती करावी. 

-अरुण प्रकाश, व्यवस्थापक,  जिल्हा अग्रणी बँक.जळगाव.

जळगाव । प्रतिनिधी

शेतकर्‍यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी निवडणुकांच्या तोंडावर केंद्रसरकारने सहा हजार रुपये वार्षिक मानधन देण्याची मोठी वल्गना केली होती. यासाठी पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करण्यासोबतच माहिती मिळविण्यासाठी युध्द पातळीवर प्रशासनाला कामाला लावण्यात आले होते. असे असलेतरी जिल्ह्यात एक वर्ष उलटूनही  जवळपास 80 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यात दमडीही पडलेली नाही. तांत्रिक चुकांसह महसूल विभागाच्या गलथानपणामुळे जिल्हा प्रशासनाकडे निधी पडून असतांनादेखील तो निधी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होवू शकलेला नाही.

या योजनेंतर्गत जिल्हयातील 8-अ प्रमाणे  6लाख, 46हजार,400 शेतकरी खातेदार आहेत. यायोजनेंतर्गत आतापर्यत निम्मेपेक्षा कमी खातेदार शेतकर्‍यांना लाभ मिळाला असून शेतकर्‍याीं दिलेली माहितीचा डाटा आधार संलग्न नसल्याने शेतकर्‍यांना लाभाची रकम मिळण्यास अडखणी निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.

पीएम किसान योजनेसंदर्भात माहिती संकलन व दुरुस्तीसाठी संबंधित बँक अधिकारी कर्मचार्‍यांशी संपर्क साधावा. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना समान तीन हप्त्यात सहा हजार रूपये बॅक खात्यावर लाभ देण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.  जिल्हयातील 6लाख 46हजार 400 शेतकर्‍यांपैकी आतापर्यत प्रत्यक्ष पात्र लाभार्थी कुटुबांची नोंदणीसंख्या केवळ 3लाख 76हजार 283 इतकीच आहे.

तर जिल्हयातील  1लाख 77 हजार शेतकरी नोंदणी होवूनही चुकीची माहिती, संयुक्त वा जोड बॅक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक यांची चुकीची नोंद घेण्यात आले असल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचीत असल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान लाभ मिळण्याच्या आशेपोटी शेतकरी जिल्हा बँकांच्या चकरा मारत असतांना बँकेकडून व महसूल विभागाकडूनदेखील कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग गोंधळात पडला आहे. पैसे टाकायचेच नव्हते तर घोषणा कशाला केल्या? असा सवालही आता, शेतकरी उपस्थित करीत आहेत.

नोंदणी झालेले लाभार्थी

15 तालुक्यातील  8-अ प्रमाणे खातेदार शेतकरी व कंसांत प्रत्यक्ष लाभार्थी पुढीलप्रमाणे जळगाव-41115(24215),जामनेर-58126(37190),एरंडोल28454 (18495),धरणगांव-35315(17276),पारोळा-44444(28225),भुसावळ-21236(1220), बोदवड-16852(10083),मुक्ताईनगर26865(15044),यावल-47055(25399),रावेर,48583,(27838), अमळनेर-71429(39152),चोपडा-43929(23895),पाचोरा- 51194(35682),भडगांव-38145(22419),चाळीसगांव-73658(43161)एकुण-646400 (376283)असे लाभार्थी आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com