Type to search

Featured सार्वमत

कृषी स्वावलंबनसाठी जिल्ह्याला 8 कोटी 85 लाखांचा निधी

Share

सुक्ष्म सिंचनासाठी 90 टक्के अनुदान

अहमदनगर (प्रतिनिधी) – सन 2019-20मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेसाठी राज्याला दोनशे त्र्याहत्तर कोटी बासष्ट लाख सदोतीस हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यापैकी नगर जिल्ह्याच्या वाट्याला 8 कोटी 85 लाख 72 हजारांचा निधी आला आहे. नाशिक विभागात हा सर्वाधिक निधी आहे. विशेष म्हणजे या योजने अंतर्गत सुक्ष्म सिंचनासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

शासन निर्णयान्वये विशेष घटक योजना सुधारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी सामाजकि न्याय्य व विशेष सहाय्य विभागामार्फत संबंधित जिल्हा परिषदांना निधी वितरीत करण्यात येईल आणि योजनेच्या अंमलबजावणीस वित्तीय मान्यता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात येईल.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या निवडीसाठी किमान 0.40 हेक्टर क्षेत्र मर्यादा लागू राहिल व नवीन विहीर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान 0.20हे. क्षेत्र मर्यादा लागू राहिल आणि योजनेतंगर्गत सर्व बाबींसाठी 6 हेक्टर क्षेत्र मर्यादा लागू राहिल.

10 अश्‍वशक्ती क्षमतेपर्यंतचे विद्युतपंप संचाकरीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार अनुदान देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संच बसविण्याचा मंजूर मापदंडानुसार एकूण खर्च 1 लाख 58 हजार 730 रूपये व त्यापेक्षा कमी झाल्यास लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रति थेंब अधिक पीक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजनांच्या माध्यमातून 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
यापेक्षा जास्त खर्च झाल्यास अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचना योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेतून 55 टक्के अनुदान देण्यात येईल व डॉ. आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 50 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांना तुषार सिंचन संच बसविण्याचा खर्च 79 हजार 363 वा त्यापेक्षा कमी झाल्यास दोन्ही योजनेतून 90 टक्के अनुदान अदा करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची सुविधा महा-ऑनलाईन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेतंर्गत बाबींच्या अनुज्ञेय रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने वर्ग करण्यात येणार आहे.

या कामांसाठी निधी…
या योजनेअंतर्गत 1 लाख 50 हजार मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्‍या अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकर्‍यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरिग, वीज जोडणी आकार, पंपसंच, शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच’ यासाठी हे अनुदान देण्यात येते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!