Type to search

Featured सार्वमत

कृषी विभागाचे जिल्हाभर छापासत्र

Share

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश । 18 पथकांकडून दिवसभर तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरमध्ये सापडलेल्या मुतदबाह्य कीटकनाशके प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गंभीर दखल घेतली असून, शनिवारी सुट्टीच्या दिवशी कृषी विभगाच्या 18 पथकांनी जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली. यात त्रुटी आढळलेल्या दुकानांना तेथेच विक्री बंदचे आदेश दिले आहेत.

नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी पृथ्वी अ‍ॅग्रो सेर्व्हिसेस या बड्या कृषी सेवा केंद्रामध्ये मुदतबाह्य कीटक नाशके आढळली. मुदत संपलेल्या कीटकनाशकांचे लेबल बदलून ते विक्रीसाठी बाजारात पाठविले जात होते. पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेस हे जिल्हा स्तरावरील कृषी निविष्टा विक्री केंद्र आहे. त्यांच्यामार्फत तालुका व गावपातळीवरील कृषिकेंद्रात कृषी निविष्टांचे वितरण होत होते. पृथ्वी अ‍ॅग्रोवर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी लगेच कृषी विभागाने विक्रीबंदचे आदेश दिले. त्यांच्यासह ज्या ज्या ठिकाणी पृथ्वी अ‍ॅग्रोचा माल वितरित झाला, त्या सर्व ठिकाणी विक्री बंद ठेवण्यास सागण्यात आले आहे.

दरम्यान शनिवारी सायंकाळी पृथ्वी अ‍ॅग्रोच्या गोडावूनमधील त्या कीटकनाशकांच्या साठ्याची मोजमाप पूर्ण झाली. मात्र त्याचा तपशील सोमवारी देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दोन कृषी विभागाच्या 10 अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकांने या ठिकाणी तपासणी पूर्ण केली आहे. या ठिकाणी सापडलेल्या आक्षेपार्ह बाबींची नोंद घेण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर कृषी विभागाच्या 18 पथकाने जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्र पिंजून काढले. या पथकांत तालुका कृषी अधिकारी, तालुका पंचायत समिती, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तंत्र अधिकारी यांचा समावेश होता. या पथकांनी तालुका व गावपातळीवरील कृषी केंद्रामध्ये जाऊन कागदपत्रे, खते, बियाणे आणि किटकनाशके याचा साठा तपासला. याचा ही अहवाल रविवारी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.

लॉबी सक्रिय
पृथ्वी अ‍ॅग्रोवर कृषी विभागाने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील परस्परविरोधी दोन लॉबी सक्रिय आल्या आहेत. एक लॉबी पृथ्वी अ‍ॅग्रोच्या बाजूने तर दुसरी त्यांच्या विरोधात आहेत. व्यवसायाच्या स्पर्धेतून कृषी क्षेत्रातील या लॉबीत संघर्ष सुरू असून त्याचा फटका शेतकर्‍यांना बसण्याची चिन्हे आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!