Type to search

सार्वमत

दोन कोटींच्या कृषी निविष्ठांची विक्री बंद

Share

कृषी विभागाचे छापे : 50 कृषी केंद्रांचा अहवाल बाकी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार शनिवारी जिल्हाभर कृषी विभागाच्या 18 पथकांनी कृषी केंंद्रांवर छापे टाकले होते. यात 14 तालुक्यांतून 126 कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. यातील 76 केंद्रांचा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाला आहे. यात 2 कोटी 50 हजार रुपयांच्या खते, बियाणे आणि कीटकनाशके यांच्या विक्रीला कृषी विभागाने बंद घातली आहे.

नगरमधील पृथ्वी अ‍ॅग्रो सव्हिसेस या बड्या कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठांचे जिल्हा वितरक यांच्या गोडावूनमध्ये मुदतबाह्य कीटकनाशकांचे लेबल बदलून त्याठिकाणी नव्याने लेबल लावून ते बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेत जिल्ह्यातील कृषी केंद्रांची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी सकाळपासून जिल्हा अधीक्षक कृषी यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकारी, तालुका गुणनियंत्रक यांच्या उपस्थितीत 14 तालुक्यांतील कृषी केंंद्रांची तपासणी केली. या तपासणीसाठी 18 पथके तयार करण्यात आली होती. या पथकाला प्रत्येक तालुक्यातून 7 याप्रमाणे 126 कृषी केंद्र तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील 76 कृषी केंद्रांचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास प्राप्त झाला आहे.

त्यात 80 लाख 79 हजार रुपयांचे 9 ठिकाणी बियाणे विक्री बंदचे आदेश दिले आहेत. 45 लाख रुपयांचे 10 ठिकाणी विक्री बंद आदेश आणि 74 लाख 39 हजार रुपयांचे 31 ठिकाणी कीटकनाशके विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहेत. अद्याप 50 ठिकाणाचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालेला नाही. याठिकाणी 50 ते 80 लाख रुपये किंमतीचे कृषी निविष्ठा विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले असावे, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

यामुळे केली कारवाई

  • जिल्ह्यातील कृषी केंद्रात लायसेन्स उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, स्टॉक बुक अपूर्ण असणे, साठा न जुळणे, मासिक अहवाल तयार नसणे आणि कृषी विभागाला सादर न करणे, कृषी केंद्रात शेतकर्‍यांच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर न लावणे, कृषी निविष्ठा विक्रीच्या बिलावर शेतकर्‍यांच्या सह्या न घेणे, कृषी विभागाला कृषी निविष्ठांच्या खरेदीचे बिल उपलब्ध करून न देणे यांचा यात समावेश आहे.
  • ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने जिल्ह्यातील कृषी केंंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यापुढेही काही महिन्यांनी अशा प्रकारची अचानक कारवाई करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!