Thursday, May 2, 2024
Homeनगरशेतमालाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी संकटात - चव्हाण

शेतमालाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी संकटात – चव्हाण

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असून शेतकर्‍याला आर्थिक संकटातून सोडविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने शेतमालाला किमान हमीभाव देण्यासाठी ठोस कृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संपाच्या पुणतांबा गावातील संपातील ज्येष्ठनेते बाळासाहेब चव्हाण यांनी केले.

- Advertisement -

सध्या कांद्याचे सरासरी दर 1200 ते 1400 प्रतिक्विंटल आहे. सोयाबीनचे दर 4500 ते 4800 रुपये प्रतिक्विंटल खाली आलेले आहे. गहू तसेच दुधाला सुद्धा समाधानकारक भाव नाही. भाव कमी झाल्यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुणतांबा गावातील शेतकर्‍यांनी शेतकरी संपाचे अनोखे आंदोलन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र 100 टक्के मागण्या मान्य झाल्या नव्हत्या. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने 1 जून 2022 रोजी पुन्हा आंदोलन केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या