Thursday, May 2, 2024
Homeनगरभेंडा परिसरात कृषी पंप, केबल चोरांचा धुमाकूळ

भेंडा परिसरात कृषी पंप, केबल चोरांचा धुमाकूळ

भेंडा l वार्ताहर l Bhenda

भेंडा परिसरासह संपूर्ण नेवासा तालुक्यात केबल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वारंवार होत असलेल्या कृषी पंप व केबल चोरीने शेतकरी हैराण झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यापासून तालुक्यात आणि भेंडा गावाचे परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतील पाणबुडी पंप व सबमर्सिबल पंपाच्या केबल चोरीच्या घटना घडत आहेत. शनिवार दि.23 जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी भेंडा-जेऊर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या स्टार्टर पासून पंपा पर्यंतच्या केबल कापून नेल्या.

श्रीरामपूर, शेवगाव व नेवासा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून बुधवार दि.5 डिसेंबर रोजी कृषी पंप चोरणारी एक टोळी जेर बंद केली आहे. एकाच रात्रीत सुमारे 40 ते 50 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या  केबल चोरांनी चोरून नेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या केबल चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार खरेदी व्यावसायिकांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या