Thursday, May 2, 2024
Homeनगरकृषी कायद्याला विरोध; भेंडा ते कुकाणा तिरंगा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

कृषी कायद्याला विरोध; भेंडा ते कुकाणा तिरंगा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

भेंडा |वार्ताहर| Bhenda

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीने दि 26 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या

- Advertisement -

तिरंगा ट्रॅक्टर रॅलीला सक्रिय पाठींबा देण्यासाठी भेंडा ते कुकाणा तिरंगा ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. बन्सी सातपुते यांनी दिली.

नेवासाचे पोलिस निरीक्षकांना अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समिती नेवासा शाखेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात दि.26 जानेवारी पासून देशभर तिरंगा ट्रॅक्टर रॅली करत आहेत.

देशातील 240 हुन अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सक्रिय सहभागी आहे. या आंदोलनाला सक्रिय पाठींबा म्हणून अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समिती नेवासा शाखेच्या वतीने दि 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण व राष्ट्रीय कार्यक्रम संपल्या नंतर भेंडा बसस्थानक ते कुकाणा बसस्थानक व पुन्हा भेंडा बसस्थानक अशी तिरंगा ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.

तरी तिरंगा ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टरसह सहभागी व्हावे असे आवाहन बन्सी सातपुते, बाबा अरगडे, अप्पासाहेब वाबळे, भारत अरगडे, कारभारी जाधव, ईश्वर पाठक, शरद अरगडे, गणेश खरात आदींनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या