Type to search

Featured सार्वमत

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी चाळीस कोटींचा निधी

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकर्‍यांना सहाय्यभूत ठरणार्‍या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी कृषी विभागाने तब्बल चाळीस कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी अवजारे-यंत्रांच्या खरेदीसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदान देण्यासह कृषी अवजारे बँकांनाही अनुदान देण्यात येणार आहे. शेतीकामासाठीच्या मजुरांची कमी होत जाणारी संख्या, मजुरांच्या अभावामुळे शेतीकामे वेळेवर न होणे, मजुरीचे वाढलेले दर आणि शेतीपूरक इतर साधनसामग्रीचा वाढलेला खर्च यामुळे शेतीमधून मिळणार्‍या उत्पन्नात फारशी वाढ होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पारंपरिक शेतीमध्ये बदल करुन आधुनिक पद्धतीने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करणे आवश्यक आहे.

त्यासाठी शेतीची मशागत, पेरणी, पिकांतर्गत मशागतीची कामे, कापणी आणि कापणीपश्चात प्रकिया या प्रक्रियांसाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. मात्र, राज्यातील 80 टक्के शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक असल्यामुळे यांत्रिकीकरणासाठी लागणार्‍या यंत्र-अवजारांच्या खरेदीसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने आजची योजना शेतकर्‍यांसाठी सहाय्यभूत ठरणार आहे.

ट्रॅक्टरसाठी अनुदान
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांसह अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकर्‍यांना ट्रॅक्टरसाठी 35 टक्के तर इतर बाबींसाठी 50 टक्के किंवा 1.25 लाख कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. तसेच इतर लाभार्थी शेतकर्‍यांना ट्रॅक्टरसाठी 25 टक्के तर इतर बाबींसाठी 40 टक्के किंवा 1 लाख रुपयांपैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान मिळेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!