महागाईविरोधात सोमवारी बंद

0

नगर टाइम्स,

राष्ट्रवादीचा पुढाकार, काँग्रेसच्या सुरात सूर

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीने उच्चांक गाठला असून या दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीने त्या सुरात सूर मिळवित नगर बंदची हाक दिली आहे. डिझेल दरवाढीची झळ मध्यमवर्ग, नोकरदार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचली आहे. देशातील सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन डिझेल व पेट्रोल इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सोमवारी (दि.10) भारत बंदची हाक दिली आहे. या बंदामध्ये शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी दिली. केंद्रात व राज्यात भाजपा शिवसेना सरकार येऊन चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. भाजप सरकाराने केलेल्या घोषणा या फसव्या ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी दर असताना देखील देशात पेेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. परिणामी महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्या निषेधार्थ देशातील सर्व विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली असून त्यात नगर राष्ट्रवादीही सहभागी आहे. सोमवारी नगर बंद ठेवणार असल्याचे प्रा.विधाते यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*