Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

रानू मंडल यांना प्रसिद्धी मिळताच १० वर्षांनंतर परतली मुलगी

Share

मुंबई | प्रतिनिधी

गेली अनेक वर्षे जीवाच्या अवकळा सहन करणाऱ्या राणू मंडल यांना प्रसिद्धी मिळताच त्यांची मुलगी दहा वर्षांनी त्यांच्याकडे परतली आहे. राणू मंडल यांच्याकडे फक्त त्यांचा सुंदर आवाज त्यांच्यासोबत होता.

फक्त मंडल यांच्याकडे सोबत होता तो त्यांचा सुरेल आवाज. या आवाजाने आज त्यांना जगभरात ओळख मिळवून दिली.कोलाकातामधील एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणे गात असतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

हा व्हिडीओ इतका शेअर झाला की लाखो करोडो लोकांच्या मोबाईलमध्ये राणू क्षणार्धात पोहोचल्या. या व्हिडीओने त्यांना नवी ओळख दिली. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियाच्या गाण्यांमध्ये राणू स्वत: पार्श्वगायनदेखील करणार असल्याचे म्हटले जात आहे.

रानू यांना पैसा व प्रसिद्धी तर मिळालीच पण त्याहून मौल्यवान भेट त्यांना सोशल मीडियामुळे मिळाली. तब्बल दहा वर्षांनंतर रानू यांची मुलगी त्यांच्याकडे परतली आहे.

रानू मंडल त्यांच्या मुलीपासून तब्बल दहा वर्षं दूर राहिल्या होत्या. पण व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर मुलीने त्यांचा शोध घेतला असून ती त्यांच्याकडे परतली आहे. माझी मुलगी परत आल्यामुळे खूप आनंद झाल्याचे राणू मंडल म्हणाल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!