सुरगाणा तालुक्यातील बोरगड ठाणापाडा परिसरात लावणीला प्रारंभ

0

ठाणापाडा,वार्ताहर, ता. १७ :

सुरगाणा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत पावसाने जोरदार सुरवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

शेतकरी वर्गाची शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. घाटमाथ्यावरील नागली ,वरई, भात, उडीद यांना चांगलाच भासा फुटला आहे.

बोरगड- हतगड -ठाणापाडा या परिसरातील शेतकरी वर्गाने लावणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली  आहे. या भागातील जवळपास ५० टक्के लावण्या झालेल्या दिसतात.

उर्वरित लावण्याही जोरात सुरू आहेत. गेल्या दोन दिवसात मुसळदार पाऊस पडल्याने नदी-नाले दुथर्डी भरून वाहत आहेत.

LEAVE A REPLY

*