Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : दिव्यांग विद्यार्थिनींनी अनुभवले आफ्रिकन जैम्बे ड्रम वादन; व्हिडीओ एकदा पाहाच

Share

नाशिक | प्रतिनिधी 

आधी या ड्रमवर हात फिरवा…कारण आपण त्याला आता खूप मारणार आहोत…दिव्यांग विद्यार्थिनी अचंबित झाल्या होत्या. ड्रमला मारणार म्हटल्यावर..मनात विचार आला आपल्याला तर दिसत नाही…मग ड्रमला मारणार कसं? आणि आपल्याला लागलं तर? एकमेकांना बघू न शकणाऱ्या मुलींच्या मनात मोठा प्रश्न होता. काय करावे ते समजत नव्हते.

मल्लखांब असो वा तबला वादन नेहमीच अग्रस्थानी झेप घेणाऱ्या नाशिक असोशिएशन ऑफ ब्लाइंडस (नॅब) च्या विद्यार्थिनींना हे आव्हानही तसे मोठे नव्हते. नेहमीप्रमाणे त्यांनी आयोजकांच्या प्रत्येक क्रियेला साजेशी साद दिली. अनोख्या कार्यक्रमात दिव्यांगांची हुशारी पुन्हा एकदा समोर आली.

औचित्य होते गणेशोत्सवाचे. नॅबमधील दिव्यांग मुलींसाठी जैम्बे ड्रम वादनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन  देशदूत आणि अफ्रोशेल ड्रम सर्कल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता. एकूण ७० पेक्षा अधिक दिव्यांग मुलींनी जैम्बे ड्रमवादनाचा आनंद लुटला.

नॅब संकुल येथे दिव्यांग मुलींसोबत ड्रम वादन Deshdoot Times

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

याप्रसंगी देशदूतच्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, अफ्रोशेलचे विहांग वैद्य, कुणाल देशमुख, नॅबचे मुक्तेश्वर मूनशेट्टीवर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या उपस्थिती होती.

यावेळी विहंग याने आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रत्येक विद्यार्थिनीच्या हातात ड्रम दिला. एका रांगेत बसलेल्या दिव्यांग मुलींसाठी आजचा विषय तसा खूप नवीन होता. मात्र, त्यांनी ड्रमचा आकार हाताळल्यानंतर त्यांना वादनाचा प्रकार असल्याचे समजले. दरम्यान, विहांग यांनी विद्यार्थ्यांना ड्रमचा उगम कसा झाला. या ड्रमला काय म्हणतात? याबाबत मार्गदर्शन केले.

पुढील सत्रात, ड्रम वादनाच्या वेगवेगळ्या कसरती करवून घेतला. येथील विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे सूचनांचे पालन विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. पुढे एका गाण्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी ड्रम वाजविल्याने विद्यार्थ्यांच्या आनंद द्विगुणीत झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, देशदूतच्या संपादक डॉ. बालाजीवाले यांनी विद्यार्थिनी आणि उपस्थित मान्यवरांना आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यापुढेही असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे राबवावेत असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देशदूत आणि अफ्रोशेल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.


जैम्बे वादनाचे फायदे

जैम्बे नावाचे हे वाद्य आहे. मूळ आफ्रिकेत या वाद्याला सुरुवात झाली. दरम्यान,  जगभरात प्रसिद्ध असलेले हे वाद्य वाजविल्याने हातांचा व्यायाम होतो तसेच एकाग्रता वाढते. मानसिक तणाव दूर होतो; एकदा का वादनाला सुरुवात झाली की, कितीही ताण तणाव असला तरी तो विसरून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसल्याशिवाय राहत नाही.


दिव्यांग अधिक संवेदनशील

दिव्यांग व्यक्ती एवढी संवेदनशील असू शकते हे पहिल्यांदाच अनुभवले. सुरुवातीला आम्हाला मोठा प्रश्न पडला होता की, मुली आहेत…सर्वसामान्य व्यक्त एक-दोन-तीन म्हटले किंवा हातवारे करून समजू शकतो मात्र, दिव्यांगांना कसे सांगणार? त्यांना कसे दिसणार असे अनेक प्रश्न सुरुवातील मनात येत होते. कार्यक्रमा यशस्वी होईल की नाही अशी साशंकता होती. मात्र, दिव्यांग मुलींना जे सांगितले ते त्यांनी व्यवस्थित ऐकले. ऐकून त्यांनी अनेक क्रिया करण्यास सुरुवात केली. यामुळे कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला.

विहांग वैद्य, अफ्रोशेल ड्रम सर्कल, नाशिक.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!