Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

काबूलमध्ये विवाहसोहळ्यात भीषण स्फोट; ६३ जणांचा मृत्यू

Share

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा हादरले असून एका भीषण स्‍फोटात जवळपास ६३ जणांचा मृत्यू झाला. तर तब्बल १८२ जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, काबूलच्या पश्चिम भागात विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यावेळी हा आत्मघातकी स्फोट झाला तेव्हा हॉलमध्ये हजारपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

या आत्मघातकी स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून काबूलमधील स्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे, याचा तपास घेतला जात आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!