स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे

0

स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळाची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे किंवा कमीशन वाढवून द्यावी ही दुकानदारांची मागणी रास्त असून याबाबत अधिवेशनात चर्चा केली जाईल, असे अश्वासन विरोधी पक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यानी स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळास दिले.
दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे धान्याचे कमीशन वाढवून मिळावे, धान्य मोजून दुकानात थप्पी मारून मिळावे, रॉकेल विक्रेत्यांना गॅस परवाना देण्यात यावा शभंर टक्के आधार फिडींग झाल्यावरच पाँज मशिनची सक्ती करण्यात यावी, या मागणी करीता स्वस्त धान्य दुकानदांरानी 1 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.
त्यावेळी ना. विखे पाटील म्हणाले, दुकानदारांच्या समस्या योग्य आहेत, त्याबाबत कसा मार्ग काढता येईल? अतिशय कमी मार्जिनमध्ये हे काम करावे लागत आहे. शासनाने पाँज मशिन दिल्यामुळे कामात पारदर्शकता येणार आहे. दुकानदाराच्या अडचणी हा राज्याचा विषय आहे. याबाबत पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. दुकानदारांनी आंदोलन न करता आहे त्या परिस्थितीत काय मार्ग काढता येईल ते पहावे. उचित न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही नामदार विखे पाटील यांनी दिली.
यावेळी जिल्हा सचिव रज्जाक पठाण, भाऊसाहेब वाघमारे, माणिक जाधव, राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वहाडणे, योगेश नागले, दत्तात्रय अभंग, आंबादास कडलग, एम. एम. जेजूरकर, चांगदेव गाडेकर, श्रीकांत म्हस्के, रघुनाथ गाडेकर, नानाभाऊ गडगे, देविदास म्हस्के, के. बी. गागरे, गणेश येलम, योगेश धनवटे, राहुल जोगदंड, आशोक जाधव, हेमत कसबे, रमेश अंभोरे, जी.व्ही. बनसोडे, एस. एस. चांडक, अशोक लकारे आदींसह राहाता, श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, संगमनेर तालुक्यातील दुकानदार व राँकेल विक्रेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*