Video : कोपर्डी प्रकरणातील दोषींना होऊ शकते फाशी; २२ ला अंतिम निकाल शक्य

0

अहमदनगर (प्रतिनिधी) ता, १८ : कोपर्डी घटनेचा निकाल २२ तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी 21 नोब्हेबर रोजी आरोपी नितीन भैलुमे याला कमीत कमी शिक्षा का द्यावी यावर होणार आहे.

तसेच मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांना कमीतकमी शिक्षा का द्यावी यावर युक्तीवाद होणार आहे. तर याच दिवशी सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम त्यांच्या युक्तीवादात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा का द्यावी हे स्पष्ट करणार आहे. त्यानंतर तिघांना न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे.

आरोप असे आहेत

आरोपी जितेंद्र शिंदे : अत्याचार 376 (अ), 302 खून, छेडछाड (354) , पोक्सो (6)(8)(16)

आरोपी नितीन भैलुमे व संतोष भवाळ छेडछाड  : (354) , पोक्सो (6)(8)(16), गुन्ह्यास प्रोत्साहन देणे (109), कट रचणे (120 (ब)) असे आरोप ठेवण्यात आले.

वरील 302, 376 (अ) १२० (ब), १०९ या गुन्ह्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे.

कोपर्डी अत्याचार प्रकरणी तपासात होत्या उणिवा: ॲड. उज्ज्वल निकम

कोपर्डी  अत्याचार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपींसह इतर दोघा सहआरोपींना आज न्यायालयाने दोषी  ठरविले.

तपासात अनेक उणिवा होत्या, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, तरीही पोलिस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आज आरोपींना दोषी ठरविता आले असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी या खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची ही प्रतिक्रिया.

 

कोपर्डीची सुनावणी २१ नोव्हेंबरला; मुख्य आरोपी शिंदेसह तिघेही दोषी

LEAVE A REPLY

*