अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची लूट

0

छात्रभारतीची तक्रार : शिक्षणाधिकार्‍यांच्या आदेशानंतर 15 ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित

अहमदनगर (प्रतिनिधी)- अकरावी व बारावी प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार होत विद्यर्थ्यांची आर्थिक लूट झाल्याच्या निषेधार्थ छात्रभारती संघटनेच्यावतीन माध्यमिक शिक्षण विभागाचे गेट बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी छात्रभारतीचे आंदोलनकर्ते आणि शिक्षणधिकारी यांच्यात चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यात चौकशी समिती नेमुन चौकशीचा निर्णय झाल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे रविंद्र गुजांळ यांनी दिली.
अकरावी व बारवी प्रवेश प्रक्रियेत शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ज्युनिअर महाविद्यालयात गैरप्रकार होत असल्याची तक्रार छत्रभारती संघटनेच्यावतीने माध्यमिक शिक्षणधिकारी यांच्याकडे केली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर महाविद्यालयातील अकरावी आणि बारावी प्रवेशाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी सोमवारी माध्यमिक शिक्षण विभागात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलवले. यावेळी झालेल्या चर्चेत अकरावी आणि बारावीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश अर्ज देण्यात यावा, पैसे भरल्याची पावती त्याच दिवशी मिळावी, बारावी मधील मुलींना मोफत शिक्षण असून त्यांच्याकडून पैसे घेऊ नये, क्षमतेपक्षा अधिक प्रवेश दिलेल्या महाविद्यालयावर कारवाई करण्यात यावी, तसेच अकरावी आणि बारावी प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय चौकशी समिती नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
  • शिक्षणधिकारी पोले यांनी ही मागणी मान्य केली आहे.
    14 तालुक्यातील अकरावी प्रवेशाची चौकशी करण्यात येणार आहे.
    या चौकशी समिती गठीत करण्यात येणार आहे.
    चौकशी समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी आणि छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे.
    यावेळी दत्ता ढगे, रवींद्र गुंजाळ, अक्षय दिवटे, योगेश शिंदे, प्रमोद मांडे, विक्रम भिंडे, रेखा खर्डे, संकेत शिंदे, अमोल वाळके, अनिकेत घुले आदी उपस्थित होते. 
  • छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून संगमनेरच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यावर आम्हाला याबाबत अधिकार नसल्याचे सांगण्यात आले होते. सोमवारी नगरला झालेल्या चर्चे दरम्यान, पोले यांनी संगमनेरच्या गट शिक्षणाधिकार्‍यांना लेखी पत्र पाठवून तालुक्यातील अकरावी प्रवेशाची चौकशी करून नगरला अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*