आदिवासी विकास परिषद आंदोलनकर्त्यांनी आदिवासी भवनाला ठोकले टाळे

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. १९ : आदिवासी विकास परिषदेच्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी आज आदिवासी विकास भवनाला टाळे ठोकले. गेल्या २४ तासांपासून विद्यार्थी आणि पालकांचे हे आंदोलन सुरू आहे.

नामांकित शाळेत प्रवेश मिळावा तसेच इ. ४ थी चे वर्ग बंद करू नयेत यासाठी आंदोलन सुरू आहे.

कालही याच मागणीसाठी आदिवासी विकास भवनासमोर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून अनोख्या पद्धतीने ‘टिंकल-टिंकल’लिटल स्टार म्हणत आंदोलन करण्यात आले होते.

आदिवासी समाज कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे. परंतु राज्य सरकारच्या आश्रमशाळा शिक्षण बंद करण्याच्या आदेशाने आदिवासी समाज आणखी अशिक्षित होईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले होते.

सरकारने हा निर्णय रद्द केला नाही, तर आदिवासी विकास भवनात शाळा भरविण्यात येईल असाही इशाराही त्यांनी दिला होता.

LEAVE A REPLY

*