सुरगाण्यात तालुकास्तरीय आदिवासी मराठी साहित्य संमेलन

0

सुरगाणा | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व आदर्श युवा मंडळ आयोजित सुरगाणा तालुका स्तरीय आदिवासी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार दि.10 ऑगस्ट 2017 रोजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरगाणा येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील नवोदित लेखक, कवी, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, साहित्यप्रेमी, वाचक यांना आपल्या लेखन व कलाकृतीची निर्मिती पूर्णपणे करण्यासाठी मार्गदर्शन व मराठी वाचन संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने मराठी व भाषेचे अंगभुत ओळखून, आधुनिक गतिमान युगातील आव्हाणे पेलण्यासाठी मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणुन सर्वांगाने विकशित करण्याचा साहित्य संमेलनाच्या माद्यमातून विचार व्हावा.

आदिवासी भागात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, साहित्य संस्कृती यांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी उदघाटक – मा.प्रा.संजय जाधव संपादक, आमची माती आमची माणस हे असतील.

संमेलनाद्यक्ष : मा.कवी तुकाराम धांडे

प्रमुख अतिथि पुंजाजी मालूंजकर (जेष्ठ साहित्यिक) साहित्य संमेलनाचे पुरस्कार्थी म्हणुन रतन चौधरी सुरगाणा यांचा गौरव केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*