Type to search

Featured सार्वमत

आढळा नदीवरील सांगवी तलाव ओव्हरफ्लोे

Share

सावरगांव पाट (वार्ताहर)- अकोले तालूक्यातील आढळा परिसराला वरदान ठरणारे सांगवी तलाव पूर्णक्षमतेने भरले. तलावाची पाणी साठवण क्षमता 71 द.ल.घ.फु.इतकी आहे. यापूर्वीच पाडोशी तलावही भरले होते. नदीच्या लाभक्षेत्रात पावसाने पाठ फिरविल्याने सांगवी तलावात पाण्याची आवक कमी झाली होती. यामुळे सांगवी तलाव उशिरा भरले.

सांगवी तलावातील पाण्याचा उपयोग केळी-रुम्हणवाडी, टाहाकारी, नागवाडी, घोडसरवाडी, समशेरपूर, सावरगांव पाट, सांगवी या गावांना शेतीसाठी होतो. आढळा परिसरात मागील वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत चांगला पाऊस पडला आहे. सध्या आढळा नदीवरील पाडोशी, सांगवी ही दोन्ही तलाव भरल्याने आढळा नदी तुडुंब भरून वाहत आहे. आढळा तलावातही पाण्याची आवक सुरु झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने या परिसरात पाठ फिरवली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा हि शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. सांगवी पाडोशी या तलावांच्या पाठोपाठ आढळा तलावही कधी भरते याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!